किआ सॉनेट एसयूव्ही भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. ब्रेजा,वेन्यू आणि नेक्साॅन पेक्षाही कमी किंमत असल्याने बाजारामध्ये चांगली स्पर्धा पहायला मिळेल.
किआ सोनेट मध्ये तीन इंजन ऑप्शन ग्राहकांसाठी देण्यात आले आहेत. सोनेट ही सेल्टोस आणि कार्निवल नंतर किआ मोटर्सची भारतीय बाजारपेठेत दाखल झालेली आहे.
किआ सॉनेट आत्ताच भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. किआ ने आपल्या एसयूव्ही सॉनेट ला 6.71 लाखा सुरवातीच्या किंमती मध्ये उतरवले असून हाय ऐंड व्हेरीएंट ११.९९ लाखां पर्यंत जाते. हे सेल्टोस आणि कार्निवल नंतर किआ मोटर्सची भारत मध्ये तिसरी कार आहे. सेल्टोस प्रमाणेच सॉनेट एसयूव्ही देखील दोन व्हॅरियंट लाइन- टेक लाइन आणि जीटी लाइन मध्ये ऑफर केले गेले आहे.
इंजिन ऑप्शन
किआ सॉनेट तीन इंजिन ऑप्शन मध्ये उपलब्ध असून यामध्ये 83 एचपी पावर चे १.२ लीटर नेचुरली-एस्पर्टेड पेट्रोल व १२० एचपी पावर वाले 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे, तसेच सॉकेटमध्ये 1.5-लीटरचे डिझेल इंजिन उपलब्ध आहे, जे 100 एचपी आणि 115 एचपी पावर आउटपुटसह देते.
1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन मध्ये 6-स्पीड आयएमटी आणि 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गियरबॉक्स ऑप्शन मध्ये उपलब्ध असून
100 एचपी पावर वाल्या डिझेल इंजिनसह 6-एसपीडी मॅन्युअल आणि 115 एचपी पावर वाल्या डीजल इंजनसह 6-स्पीड टॉर्क-कन्वर्टर ऑटोमेटिक गियरबॉक देण्यात आला आहे. किआ सोनेट एसयूव्हीची किंमत
मायलेज
किआ सॉनेट एसयूव्हीची 1.2-लीटर पेट्रोल इंजिन चे मायलेज 18.4 किलोमीटर कॉपीि लीटर आहे. 1.0-लीटर वाल्या टर्बो-पेट्रोल इंजिन चे माइलेज 6-स्पीड आयएमटी सह 18.2 किलोमीटर तर 7-स्पीड डीसीटी ऑटोमेटिकसह 18.3 किलोमीटर प्रती लीटर आहे. डीजल इंजन च्या मॅन्युअल गिअरबॉस इंजिन व्हेरीऐंट चे मायलेज 24.1 किलोमीटर आणि ऑटोमेटिक गियरबॉक्स व्हेरीएंट चे मायलेज 19 किलोमीटर प्रती लीटर आहे.
किआ सोनेट च्या सर्व व्हेरीऐंटची किंमत
किआ सॉनेटची 1.2 लीटर पेट्रोल इंजिनची मॉडेल किंमत 6.71 लाखां पासून सुरू होऊन तीच्या टॉप मॉडेलची किंमत 8.45 लाख रुपये पर्यंत जाते. टर्बो-पेट्रोल इंजिन मॉडेलच्या आयएमटी वर्जनची किंमत ९.४९ लाखा पासून सूरू होऊन ती ११.९९ लाख रुपयां पर्यंत जाते. डीसीटी वर्जनची किंमत १०.४९ लाख रुपये आहे, तर मॅन्युअल गिअरबॉक्स वाल्या डिझेल इंजिन मॉडेलची किंमत ८.०५ लाख ते ११.99 लाख रुपयांच्या मध्ये आहे, तसेच ऑटोमेटिक गियरबॉक्स वाल्या डिझेल इंजिन मॉडेल ची किंमत १०.३९ लाख रुपये आहे.
किआ सोनेट चे फीचर्स
किआ सोनेट मध्ये अनेक फर्स्ट-इन-क्लास फीचर्स दिले गेले आहेत. डॅशबोर्ड वर १०.२५ इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4..२-इंच इंस्ट्रूमेंट क्लस्टर ,बोस कंपनी ची ऑडिओ सिस्टीम,व्हायरस प्रोटेक्शनसह इंटीग्रेटेड एयर प्योरिफायर, व्हेन्टिलेटेड सीट्स, एंबिएट लॅयटिंग व फ्रंट एसी. मोबाईल चार्जिंग पोर्ट सारखे अनेक फिचर्स कंपनीने सोनेट मध्ये देण्यात आले आहेत. सेल्टॉस आणि कार्निवल कार प्रमाणे या मध्ये पण कंपनीने UVO कनेक्टेड कार टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जिच्या मध्ये ५७ पेक्षा जास्त कनेक्टिविटी फीचर्स आहेत
सेफ्टी फीचर्स
किया सॉनेट मध्ये सेफ्टी साठी फ्रंट सिट ड्यूल एयरबैग देण्यात आली आहेत तसेच, ब्रेकिंग सुरक्षीत करणार्या साठी यामध्ये ईबीडी बरोबर एबीएस दिले आहेत , रेयर पार्किंग सेन्सर, फ्रंट डिस्क ब्रेक, सेंट्रल लॉकिंग व इमर्जेन्सी स्टाॅप सिग्नल सारखे फीचर्स स्टैंडर्ड म्हणजे बेस व्हॅरियंट मध्ये ही दिले गेले आहेत. आयएसओफिक्स चाइल्डड सीट माउंट्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम,इलेक्ट्रॉनिक स्टैबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट कंट्रोल, ब्रेक असिस्टट आणि मल्टी-ड्राइव मोड्स फीचर्स ऑप्शनल आहेत. सोनेट च्या टॉप व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्टोस गेले आहेत.
या कार्स बरोबर असेल स्पर्धा
किआ सॉनेटच्या मार्केटमध्ये टक्कर, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सन, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि फोर्ड इकोस्पोर्ट सारख्या एसयूवी बरोबर असेल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा